नमस्कार मित्रांनो,
शब्द सागर समूह आयोजित करत आहे,
भव्य काव्य लेखन स्पर्धा 2024. निमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती !
आता ही स्पर्धा आपण सर्व मिळून यशस्वी करायची आहे.यासाठी आपण सर्वांनी कविता लिहून भाग घ्यायचा आहे . आणि ताबडतोब आपल्याकडे असलेल्या संपर्क मध्ये कवींना ही माहिती पाठवायची आहे.ग्रूप मध्ये शेअर करा. अणि आपल्या what's app status..etc म्हणजेच सर्व सोशल मीडिया वर प्रसारित करा.
स्पर्धेचा कालावधी :
१ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४
प्रवेश - निःशुल्क
विजेते व पारितोषिक:
प्रथम क्रमांक
(सन्मान पत्र, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे निवडक ग्रंथ)
द्वितीय क्रमांक
(सन्मान पत्र, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे निवडक ग्रंथ)
तृतीय क्रमांक
(सन्मान पत्र, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक ग्रंथ)
चतुर्थ क्रमांक
(सन्मान पत्र, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक ग्रंथ)
सहभाग
(सर्व सहभागी स्पर्धक यांना सन्मानपत्र व भारतीय संविधान प्रास्ताविका)
नियम व अटी
१) कवितेला योग्य शीर्षक द्यावे.
२) कविता दिलेल्या विषयाला अनुसरून असावी.
३) दिलेल्या कालावधीत नमूद व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली स्वलिखित कविता पाठवावी. १५ एप्रिल २०२४ नंतर आलेली कविता स्पर्धेकरिता ग्राह्य धरली जाणार नाही.
४) काव्य रचना स्वलिखीत असावी आणि या अगोदर कुठही स्पर्धेसाठी दिलेली नसावी.
५) स्पर्धेच्या निकालाची व पारितोषिक वितरणाची तारीख नंतर कळवली जाईल.
६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७) स्पर्धेमध्ये फेरबदल किंवा इतर सर्वाधिकार आयोजक समितीकडे असतील.
आम्हाला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण ही स्पर्धा यशस्वी करण्यात आम्हला मदत करालच.
जास्तीस जास्त कविता याव्यात ही अपेक्षा अन् आपला शब्द सागर समूह पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहचवा हीच इच्छा!
धन्यवाद !