विठ्ठल सुर्यभान साळवे,
७२४९४१३०४६, नांदुरी दुमाला, ता-संगमनेर, जि-अहमदनगर
वसलेले माझे गाव आहे,
नांदुरी दुमाला असे
माझ्या गावाचे नाव आहे !!
नदीला मिळणारा जवळच
ओढ्याचा तीर आहे,
ओढ्याच्या वरच्या बाजुने
लक्ष्मि देवीचे मंदिर आहे !!
गावाकडच्या माणसांत
अजुन ही माणुसकी आहे,
मान, मर्यादा, शिस्त
अजुन ही तशीच बाकी आहे !!
गावाकडे शेतकऱ्यांना हवी
शेतातल्या घामाची गोडी आहे,
आणि सोबत शेतात जाताना
हाकवत नेणारी बैलगाडी आहे !!
सकाळ-संध्याकाळ
देवळात होणारा घंटानाद,
संपूर्ण गावाला मधुर
घाली संगीतमय साद !!
संध्याकाळी कामगारांची
कामावरून येण्याची वेळ,
गाय, वासरू हंबरण्याचा
अचुक बसणारा तो मेळ !!
वडाच्या पारावर बसणारे
बाबा, अण्णा आणि अप्पा,
सकाळ-संध्याकाळ मारत
असतात गावात तिथे गप्पा !!
आजीच्या गोष्टी ऐकत
झोपावे बाहेर अंगणात,
परि, चांदोबाच्या गोष्टी
घेऊन जाई नभागंणात !!
शहरात असलेल्यांना काही
आपत्ती आल्यावर गावच आठवतो,
गावाकडचा असलेला स्वच्छ
प्रदुषण विरहीत स्वभावच आठवतो !!
किशोर बळीराम चलाख, 9405900987
चंद्रपूर
नको शहरातील झगमग
गावातच आनंद आहे खरा
म्हणून म्हणतो मी ऐका
गड्या ! माझा गाव बरा
प्रेम आणि आपुलकी
वाहतो इथे मायेचा झरा
म्हणून ओठांवर एकच बोल
गड्या ! माझा गाव बरा
निसर्गरम्य ते वातावरण
आणि हिरवाईचा मारा
पाहताच असं वाटते मनाला
गड्या ! माझा गाव बरा
शेती आणि पुरक व्यवसाय
कष्ट हाच गावाचा मंत्र खरा
दिसते सारे गावात माझ्या
गड्या ! माझा गाव बरा
वैजयंता गजरे, पुणे, 9552247477
एक गाव त्यात बलुती बारा
बलुत्त्यांना मात्र वेशीबाहेर थारा
चांभार गावच्या आत चालत नाही तरी त्याने बनवलेली चप्पल वाचून कुणीही चालू शकत नाय महार अन मांग म्हणे अस्पृश्य हाय
पर त्यांना मेलेली जनावरं गावाबाहेर काढली नाय तर गावात किती घाण म्हईन बाय
माळ्याची जात म्हणे लई हाये खालची
पण त्याने बनवलेली माळ मात्र देवपायाशी
गावाची शान माझा हरेएक बलुती
जीवनावश्यक कला त्यांच्या समाजाच्या उपयोगी
बाबासाहेबांनी दिला माझ्या बोलूत्यांच्यासाठी लढा
तळ्याचं पानी चाखलं अन् फोडला हातामधला घडा
बलुत्यांन शिवय कुठलाचं गाव गाव राहणार नाही गावाच्या विकासाचा “कणा” माझा हरेक बलुती भाई
देशभर फिरा बघा कुठला बी गाव
प्रत्येक गावात सापडेल तुम्हाला कलाकाराचा ठाव
बलुती नका म्हणू आम्हाला आम्ही हाडाचे कलाकार
मूर्ती मधला देव सुद्धा घेऊ शकत नाही आमच्या शिवाय आकार
गाव काय? गाव कुसं काय ?
आता सगळं संपलं
गाव अन गाव कुलातलं अंतर “शिक्षणानी” हरलं
मिलिंद सुरेश जाधव, ८६५५५६९४३६
पडघा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे -४२११०१
शेतकरी दादा ला कर्जाचा ध्यास
लावतो दोर आणि घेतो फास
सांभाळू कस मी परिवारास
त्याने हो घेतला अखेरचा स्वास
सरकारला जाग आता तरी येईल काय
गावात बदल आता मला घडवायच हाय
मतदानवेली तू बॅनर्स लावला
काम नाही केलीत पण दिल्लीत मिरवला
योजनेचा प्रस्ताव कागदावरी गिरवला
सरकारी निधी तू घरात फिरवला
भारताची लोकशाही धोक्यात हाय
गावात बदल आता मला घडवायच हाय
शिकून मी, शिकून मी
बदलून टाकेन सारा गावं
दिल्ली परी करेन मी गावाचं नाव
नाही सोसणार आम्ही
आता आमच्या गावावर घाव
हाती विकासाची पाटी घ्यायची हाय
गावात बदल आता मला घडवायच हाय
वर्षा शिदोरे , ८७९३७९९७७७
नाशिक
हार जीत शर्यतीचा जरी गोंधळ
मनामनात सहप्रेमाचा ध्यास
गाव शहर भेदाभेद होतो क्षीण
अंतिमतः काळजीचा घास...
रम्य दिवस उजडे पहाटेचा
ग्राम मौजमजेचा सगळ्यांच्या
सुख-दुःखात नेहमी आनंदी
मनापासून आस्वाद जगण्याचा...
माळरानावरची झाडं, झुडपं
गुरंढोरं नि किलबिल पक्षी मित्र
सगळेच प्रिय सर्वा लेकरांसमान
काळजातलं प्राणप्रिय चित्र...
राबतात शेतात, काही नोकरीत
फेरफटका मारण्यास शहरी जाता
विसरत नाहीत कुटुंबकबिलास
शहराची वासना पोटापायी होता...
सरळ सोपं ग्रामीण गाव जीवन
बीज अंकुरित साधं राहणीमान
मनमिळाऊ स्वभावाची माणसं
विचारांनी एकसमान बागडणं
मयुर विष्णू चव्हाण, 7218980064, 9309537037
बुलढाणा.
प्रतेकाच्या स्वप्नाच एक गाव असत
नक्किच प्रेमळ अस त्याच नाव असत.
प्रेमाची भावना असते ती गावात
जरी नसल काही घरी तरी जगण असत जोमात
गाव हा प्रेमाचा असतो भल्ला मोठा महासागर
एकमेकांच्या प्रेमाशिवाय न चालणार आहे तो खासर
एकमेकांच्या मदतीला तत्पर असतात नेहमी लोक
जरी नसाल कोणी सोबत तरी जात मनुष्याची सोबत असते एक.
गावात लोकांची राहणी खरच खुप भारी असते,
न महागडे कपडे असतात, न कोणी हसते.
न कोणी पाहणार असत न कोणी निहाळणार ,
सगळे तर आपले असतात न कोणी बाहेरच येणार.
तांबडी ती लाल माती असते , असते घर कौलारू ,
एका घरावरुन दुसर्या घरावर उडया मारते ती गोंडस खारू
जरी घर असल छोट तरी मन मात्र मोठ असत,
निस्वार्थ ते जगण असत, जे फक्त गावातच असत.
तेच हे गाव असते जे स्वर्गापरी सुंदर असते,
न कसली धावपळ आणी न कसली पगार असते.
जगतात सगळे एकोप्याने, न कसला वाद असतो,
मानतात सगळे एकमेकांना आपल न कसला घात असतो.
हेच ते गाव असत जे एकोप्याने जगत ,
आल्या कितिही जरी अडचणी तरी गाव मात्र सोबत असत.
हेच ते गाव असत जे असत ऐक्याच प्रतिक
नाहितर आजही शहरात लोकांचे बंगले ओसाड पडलेत कित्येक.
महेंद्र पवार, 8698387894
पाचोरा, जळगाव
गाव म्हटलं की आठवते ती
गावाकडच्या शेतातील काळी माती..
मायेच्या ममतेने भरल्या डोळ्यांनी
जवळ करणारी आपुलकीची नाती..
गाव म्हटलं की आठवतो दुष्काळात विहरींना फुटलेला आशेचा पाझर..
जिथे असतो माझ्या बापाला मान
आणि राखला जातो मोठ्यांचा आदर..
गावं म्हटलं की आठवते माझ्या
गावाकळील कौलारूंची शाळा..
अजूनही आठवतो तो मास्तरांनी
शिकविलेला साताचा पाढा..
गाव म्हटलं की आठवते सकाळच्या
प्रहरातील कोकीळ मंजुळेची गाणी..
दोन वेणी बांधलेली पिंकी अन हाफ
चड्डी वाला गण्याची प्रेम कहाणी..
गाव म्हटलं की नेहमीच आठवते
ती सर्जा राजा बैलांची जोडी..
मोठे झालो तरी संपली नाही
शेतात क्रिकेट खेळायची गोडी..
रेखा कुलकर्णी, 8411958226
चिंचवड पुणे
रुंजी घालतो मनात ,
माझ्या गावाचा हा वारा .
ओढ अंतरात गड्या ,
आपलाच गाव बरा .....१
जागे करी पहाटेला ,
अरवून हा कोंबडा .
मंदिरात घंटानाद ,
पडे अंगणात सडा .....२
स्तोत्र आणि मंत्रोच्चार ,
पूजा पाठाचा नियम .
कांदा भाकरी न्यहारी ,
मग चाले नित्य काम .....३
भ्रष्टाचार नाही इथे ,
नाही भेसळ कशात .
शुद्ध चारित्र्याचे बीज ,
आहे पेरले मनात ......४
मुक्त मोकळे आकाश ,
नसे प्रदूषणा थारा .
ताजा सकस आहार ,
फुले निसर्ग हा सारा ....५
सणवार साजरे हो ,
सारे मिळून करती .
इथे येत नाही आड ,
कुणाचाही धर्म , जाती ....६
सुखदुःख वाटतात ,
धीर देती एकमेका .
प्रसंगाला घेती धाव ,
सावरती साऱ्या चुका .....७
सांजवात लावताना ,
शुभमकरोतिचा स्वर .
नसे भांडण , ना तंटा ,
आनंदात असे घर ......८
फ्टॅल संस्कृतीने केले ,
इथे आयुष्य बंदिस्त .
सण , संस्कृती , नात्यांना ,
केले साऱ्यांनी उध्वस्त ....९
पैशासाठी जीने इथे ,
धावपळ पैशासाठी .
माय बापाला ना थारा ,
दोघे जाती कामासाठी .१०
आपलाच गाव बरा ,
गड्या तुम्हाला सांगतो .
शहरात राहूनिया ,
गाव मनात जपतो .....११